Samachar Nama
×

शिवभजन अपर्याप्त ठाणे, पालघर जिलों में!

ठाणे : राज्यातील सर्वाधिक स्थलांतर होणारा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात असली तरी या जिल्ह्यात अवघी ३० शिवभोजन केंद्रे असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाण्याला लागूनच असलेल्या पालघर या आदिवासीबहूल जिल्ह्यात अवघी नऊ शिवभोजन केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील गरजूंना राज्य सरकारच्या योजनेचा पुरेसा लाभ मिळत
शिवभजन अपर्याप्त ठाणे, पालघर जिलों में!

ठाणे : राज्यातील सर्वाधिक स्थलांतर होणारा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात असली तरी या जिल्ह्यात अवघी ३० शिवभोजन केंद्रे असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाण्याला लागूनच असलेल्या पालघर या आदिवासीबहूल जिल्ह्यात अवघी नऊ शिवभोजन केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील गरजूंना राज्य सरकारच्या योजनेचा पुरेसा लाभ मिळत नाही.

विद्यमान राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू, कामगार आणि मजुरांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षीच्या टाळेबंदीच्या काळात पाच रुपये दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मजूरवर्गाला या योजनेचा लाभ झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या टाळेबंदीत कुणाचीही उपासमार होऊ  नये म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात या शिवभोजन केंद्रांची संख्याच कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वाधिक स्थलांतर होत असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. ठाणे आणि पालघर या जिल्ह्याची २०११ साली सुमारे १ कोटी १० लाख लोकसंख्या होती. सध्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या दीड कोटी असल्याचे बोलले जाते. सर्वाधिक औद्योगिक क्षेत्र, सर्वाधिक मजूर, कामगार वास्तव्यास असलेल्या या जिल्ह्यात राज्य शासनाने मंजूर केलेल्या शिवभोजन केंद्रांची संख्या अवघी ३० असल्याचे समोर आले आहे. तर पालघर जिल्ह्यात अवघी ९ शिवभोजन केंद्रे सुरू असल्याची माहिती अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.मजूर, कामगारांचे शहर असलेल्या अंबरनाथ शहरात एकही मंजूर शिवभोजन केंद्र नाही. ठाणे जिल्ह्यात दररोज ६ हजार ७५० थाळी वितरणाला परवानगी आहे. मात्र केंद्र नसल्याने त्या क्षमतेने थाळी दिली जाऊ  शकत नाही.

Share this story